कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

शरद पवार ते अमित शहा… सर्वच सरकारांच्या पाठबळामुळे सहकार चळवळ बळकट- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव

केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त मराठा भवनात सहकार मेळावा; सहकारी संस्थांनी आधुनिकतेची कास धरावी - ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी- केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने रत्नागिरीतील मराठा भवन येथे सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते विद्यमान केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्यापर्यंत विविध सरकारांनी सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या सर्वांच्या पाठबळामुळेच महाराष्ट्रासह कोकणातील सहकार चळवळ अधिक सक्षम आणि वृद्धिंगत झाली,”असे प्रतिपादन केले.

 

यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. गिम्हवणेकर, बँकेचे संचालक व स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, संचालक रामभाऊ गराटे,अमजद बोरकर, आबा टिळेकर, सौ. नेहा माने, गजानन पाटील, मंदार सप्रे तसेच बँकेचे अन्य संचालक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड. दीपक पटवर्धन यांनी सहकारी संस्थांनी बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा स्वीकार करण्याची गरज व्यक्त केली. सहकारी संस्थांनी सक्षम व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. संस्थांची प्रगती झाली तर त्याचा थेट लाभ गावांच्या विकासालाही होतो. त्यामुळे काळानुरूप बदल स्वीकारत सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे,” असे ते म्हणाले.

 

कार्यक्रमात सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणावर, आधुनिक व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि ग्रामीण विकासामधील सहकार चळवळीच्या योगदानावर सविस्तर चर्चा झाली. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या मेळाव्यात सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, संचालक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button