रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत चिपळूण येथे दि. ३१ जुलै ते दि.०२ ऑगस्ट या कालावधीत सहकार कार्यकर्ता निवासी प्रशिक्षणाचे आयोजन
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत चिपळूण पालवन येथे दिनांक 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीमध्ये सहकार कार्यकर्ता निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात सहकारी संस्था अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. राज्याच्या पतरचनेत जिल्हा बँका व सहकारी संस्था अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. सहकारी संस्थांमध्ये सहकारी कायदा, वित्तिय व्यवस्थापन, संचालक मंडळाची कार्यपध्दती, जबाबदारी आणि लेखापरीक्षण या सारख्या महत्वाच्या घटकांचा समावेश असतो. सहकारी संस्थांचे संचालकांना सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहणेकरीता याबाबत माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे.
तसेच सहकाराचे महत्व आजच्या तरुणांना कळावे, सहकारात काम करणारे तरुण नेतृत्व व त्यातून ग्रामीण व कृषी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी सहकारात काम करणारे व करु इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना व सहकारातील आधुनिक तंत्रज्ञान, बँक व्यवसाय, विकास व इतर सर्व सहकारी संस्थांचे व्यवसायातील माहिती देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकार क्षेत्रातील नामांकित डॉ. विठ्ठलराव विखेपाटील प्रबंध संस्थान, पुणे या प्रशिक्षण संस्थेद्वारे कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण ता. चिपळूण येथे दि. ३१ जुलै २०२६ ते दि.०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करणेत येत आहे. सदर प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या इच्छूक सहकारी संस्था पदाधिकारी / सदस्य / कार्यकर्ता यांनी प्रशिक्षण प्रवेश अर्ज व अन्य माहितीसाठी त्या-त्या तालुक्यातील बँकेचे क्षेत्रीय कार्यालय अथवा प्रधान कार्यालयातील प्रशासन विभाग रत्नागिरी येथे संपर्क साधून दि.२८.०७.२०२६ सायंकाळी ५.०० वा. पर्यंत अर्ज सादर करणेचे आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रमाणपत्र देणेत येईल.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



