मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत रक्तदानाचा महायज्ञ; यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगचा पुढाकार
मुख्यमंत्री देवेंद्द्र्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ट्रस्टी बाळासाहेब माने यांचा वैद्यकीय क्षेत्रासाठी तांत्रिक मनुष्यबळ वाढविण्यावर भर

रत्नागिरी- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग, रत्नागिरी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यश फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री. बाळासाहेब माने यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या रक्तदान शिबिराला कॉलेजचे प्राचार्य श्री. चेतन अंबुपे, रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, सह-रजिस्ट्रार सौ. मानसी मुळे, असिस्टंट प्रोफेसर सौ. अर्चना बाईत, रेडक्रॉस सोसायटीच्या डॉ. मेहेक काझी आणि नाझिया खलिफे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ट्रस्टी श्री. बाळासाहेब माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी कोकणाच्या विकासासाठी आणि विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण मदत केल्याचे सांगितले. तसेच, आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित आणि तांत्रिक मनुष्यबळाची मोठी गरज भासणार असल्याने दर्जेदार नर्सिंग शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान करत सामाजिक जबाबदारीची जाणीव जपली. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.



