आरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

यश फाऊंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयाचा बहुमान

रत्नागिरी – रत्नागिरी येथील यश फाऊंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट**ला राज्यस्तरीय ‘दैनिक नवभारत एज्युकेशन अवॉर्ड – २०२६’ मध्ये “Most Reputed College of Maharashtra for Nursing and Paramedical Education” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या यशाबद्दल संस्थेने सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी तसेच हितचिंतकांचे आभार मानले असून हा पुरस्कार संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

या पुरस्काराचे वितरण बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी दुपारी १०.३० वाजता हॉटेल ताज प्रेसिडेंट, कफ परेड, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात होणार आहे.

या गौरवाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व सहकाऱ्यांचे आणि शुभेच्छुकांचे आभार मानण्यात आले असून भविष्यातही गुणवत्तापूर्ण नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button