मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराला नाचणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मोफत आरोग्य तपासणीत शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

रत्नागिरी- ग्रामपंचायत नाचणे, ओम साई मित्र मंडळ आणि चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी नाचणे येथे मोफत रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नाचणे गावातील ग्रामस्थ व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये विविध आजारांवर मोफत तपासणी करून नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
यावेळी नाचणे ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री ऋषिकेश भालचंद्र भोंगले, पंचायत समिती सदस्य सचिन सुपल, प्रशासकीय समिती सदस्या श्रीमती निलेका नाईक, सदस्य शुभम सावंत व सौ. सुचिता घडशी, ग्रामविकास अधिकारी जी. के. खरंबळे, ग्रामपंचायत लिपिक राजेश घाग, हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री कुवळेकर, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे अधिकारी श्री ढेकणे उपस्थित होते.
तसेच ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे, सचिव प्रवीण नांदगावकर, खजिनदार पराग सावंत, माजी अध्यक्ष प्रवीण मलुष्टे, फूड कोर्ट व आगाशे मॉलचे संचालक गौरंग आगाशे यांनीही शिबिराला उपस्थिती लावली.
चिरायु हॉस्पिटलचे जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अभिजीत पाटील, स्त्रीरोग व प्रसूती तसेच वंध्यत्व उपचार तज्ज्ञ डॉ. ज्योती चव्हाण, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नितीन चव्हाण, हॉस्पिटलचे संचालक आनंद फडके, राकेश चव्हाण आणि संचालिका अनुश्री साळवी यांच्यासह वैद्यकीय पथकाने नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी आयोजकांचे कौतुक करत अशा प्रकारची आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.



