कोकणपर्यटनमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये ‘१२ वी नंतर सायन्स क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न

रत्नागिरी – रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन (टीम २०२६-२७) यांच्या वतीने कुवारबाव येथील राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये पालकांसाठी एका विशेष मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना केंद्रस्थानी ठेवून “१२ वी नंतर सायन्स क्षेत्रातील करिअरच्या संधी” या विषयावर हे व्याख्यान झाले. या कार्यक्रमात ‘कॅप्सन इन्स्टिट्यूट’चे संचालक व रोटरी क्लबचे सन्माननीय सदस्य रोटे. विनायक निकम सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरची दिशा वेळेत ठरवण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रातील नवनवीन संधींची माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास रोटरी क्लबच्या सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी शाळेची निवड केल्याबद्दल तसेच अतिशय मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल शाळा व्यवस्थापनाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन चे आभार मानले आणि असे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button