कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयसामाजिक

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा; नुकसानभरपाईसाठी २०९.१० कोटींची मदत मंजूर

मार्च, एप्रिल व मे २०२६ मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाचा निर्णय; रत्नागिरीला सर्वाधिक ९८.४४ कोटींचा निधी

मुबंई-  मार्च, एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य शासनाने एकूण ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने निर्गमित केला असून, याची माहिती मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.

या निधीपैकी कोकण विभागातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी १० लाख रुपयांची विशेष मदत मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हानिहाय मंजूर करण्यात आलेली मदत पुढीलप्रमाणे आहे

* ठाणे – ४ कोटी ८४ लाख रुपये

* पालघर – ६ कोटी ४७ लाख रुपये

* रायगड – २० कोटी २८ लाख रुपये

* रत्नागिरी – ९८ कोटी ४४ लाख रुपये

* सिंधुदुर्ग – ७९ कोटी ५ लाख रुपये

यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यास सर्वाधिक ९८ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ७९ कोटी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, नुकसानग्रस्त बागायतदारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

25/06/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button