रत्नागिरीत खाद्य व्यवसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

रत्नागिरी- अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खाद्य व्यवसायाशी संबंधित सर्व व्यापाऱ्यांसाठी शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी नव्हे तर दुपारी ११.३० वाजता महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक राधाकृष्ण मंदिर हॉल, राधाकृष्ण नाका येथे होणार आहे.
या बैठकीस हॉटेल व्यावसायिक, मिठाई विक्रेते, किराणा व्यापारी तसेच खाद्य व्यवसायाशी संबंधित सर्व व्यापाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बैठकीत अन्न सुरक्षा नियम, परवाना, स्वच्छता, अन्न गुणवत्ता तसेच विभागाच्या विविध सूचनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून उपस्थितांची नोंद घेण्यात येणार असून उपस्थित व्यापाऱ्यांची नावे अधिकृत नोंदवहीत नोंदवली जाणार आहेत.त्यामुळे सर्व संबंधित व्यापाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



