भारत मुक्ती मोर्च्या व ओबीसी मोर्च्याच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन

रत्नागिरी- भारत मुक्ती मोर्चा व ओबीसी मोर्च्या यांचे वतीने ओबीसीची स्वंतत्र जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, युजीसी अधिक मजबूत करणेचे समर्थनात व 2011 पूर्वीचे शिक्षकाना लावलेली टिईटी रद्द करणे बाबत देशभर धरणे आंदोलन मा. वामन मेश्राम व चौधरी विकास पटेल यांचे नेतृत्वा खाली पार पडत असताना रलागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे बाहेर रत्नागिरी युनिट चे वतीने बामसेफ चे जिल्हाध्यक्ष मा. समाधान पैठणे व भारत मुक्ती मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव ओबीसी वर्गातील रमेश पाजवे, सलील डाफले, नितीन तळेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रमेश पाजवे म्हणाले की, ओबीसीची जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसीना ख-या अर्थाने न्याय मिळेल, आजपर्यत क्रॉग्रेस, बीजेपीने ओबीसीची फसवणुक केली आहे. आणि पुढे न्याय मिळविणेचा असल्यास जनगणाना ही फार महत्वाची बाब असून आज रोजी ओपन म्हणूनच जनगणना झालास सर्व हक्क अधिकार सोडून गुलामगिरी पत्करावी लागणार आहे. यांसाठीच ओबीसीची स्वतत्र ओबीसी जात निहाय जनगणना होणे आवश्यक आहे.
भारत मुक्ती मोर्चाचे मा. विजय जाधव यांनी ओबीसीची स्वतंत्र जनगणना होणे गरजेचे आहे. पण ही जनगणना कोण करत नाही हे सुध्दा बघणे आवशयक आहे. केवल हिंदू हिंदू करत बसणेबरोबर हिंदू म्हणून तरी ओबीसी या मोठ्या वर्गाची जनगणना स्वतंत्र कॉलम मध्ये होणे गरजेचे होते. आणि हे सत्तेवर येताना ओबीसीची स्वतंत्र गणना करतो सांगून आम्हचे बांधवाना फसवणूक करणेचे काम कोण करत आहेत हे बघणे ही तितकेच महत्वाचे आहे.
बामसेफ जिल्हाध्यक्ष मा. समाधान पैठणे यांनी ही ओबीसी जनगणने प्रमाणे युजीसी नियमावली बाबत एस्.सी/एस्. टी मधील विद्यार्थी नैराश्य पोटी आत्महत्या करत आहेत. रोहीत वेमूला, पायल तडवी सारखी उदाहरणं आहेत. टिईटी बाबत बोळताना म्हणाले की,2011 पूर्वीचे शिक्षकांना लावलेली टिईटी रद्द करणेत यावी. शिक्षकांची झालेली सेवा विचारात घेता विदयार्थ्यांवर काही परिणाम झालेला नाही. उलट विद्यार्थ्याचा रिझल्ट चांगला आहे. त्यामुळे जाचक अट रद्द करावी. ईव्हिएम मुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. सार्वभौमत्वाला बाधा निर्माण झाली आहे.
सदरचे आदोलनात नितिन तळेकर, सलील डाफले, रमेश पाजवे, संजय आयरे, विजय कुडतडकर, शैलेंद्र औघडे, प्रकाश पवार, सुनिल ओवाल, संजय कदम वैगेरेनी भाग घेतला. ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, युजीसी नियमावली मजबूत करो, टिईटी रद्द करो घोषणा देणेत आल्या.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



