कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीय

विकासाच्या विश्वासावर संपदा तळेकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

रत्नागिरी – रत्नागिरी नगरपालिकेच्या माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा रविवारी (१५ मार्च) मांडवी येथील गगनगिरी हॉल येथे उत्साहात पार पडला.

संपदा तळेकर या गेली अनेक वर्षे भाजपमध्ये कार्यरत होत्या. मात्र, भाजपमधील गटतटाच्या राजकारणाचा फटका बसल्याने त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

यावेळी बोलताना संपदा तळेकर म्हणाल्या की, “पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठीच मी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहे.”

या पक्षप्रवेश प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, रत्नागिरी शहरप्रमुख बिपीन बंदरकर, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, महिला शहरप्रमुख स्पितल पावस्कर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदेश मयेकर, नगरसेवक बंटी कीर, नगरसेविका निवेदिता कळंबटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रवेशामुळे रत्नागिरीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button