लोकनेते शामरावजी पेजे जयंतीनिमित्त रत्नागिरीत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम

रत्नागिरी – कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई (ग्रामीण शाखा रत्नागिरी) यांच्यावतीने लोकनेते शामरावजी पेजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार, दि. 17 जानेवारी 2026 रोजी रत्नागिरी येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांची सुरुवात शनिवारी सकाळी 10.30 वाजता लोकनेते शामरावजी पेजे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून होणार आहे. त्यानंतर सकाळी 11.00 वाजता कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई (ग्रामीण शाखा रत्नागिरी) तालुका कार्यालयाचे उद्घाटन कुणबी भवन, रम्य नगर, जे. के. फाईल्स जवळ, रत्नागिरी येथे होणार आहे.
यानंतर लोकनेते शामरावजी पेजे स्मृती न्यास आणि कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती वाटप व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12.00 वाजता कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संचलित कै. रामा देवजी ढेपसे मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा होणार आहे.
सायंकाळी 4.00 वाजता कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरी तालुका महिला मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला असून, सायं. 4.30 वाजता ‘खेळ पैठणा’ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम कुणबी समाजोन्नती संघ व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने होणार आहे. सायं. 6.30 वाजता मुलींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांसाठी समाजातील बांधव व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रामभाऊ गराटे, युवा अध्यक्ष अॅड. सागर कळंबटे आणि महिला अध्यक्षा श्रीम. विनया गावडे यांनी केले आहे.
कोकण ऑनलाईन



