राजापुरात मनसेला मोठे खिंडार; तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष असून विकास, जनसेवा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान ही पक्षाची भूमिका- आमदार किरण सामंत

राजापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजापूर तालुक्यात मोठा धक्का बसला असून, मनसेचे तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, विविध पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र आहे.
राजापूर येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात आमदार किरण सामंत यांनी नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विकासकामे, सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी घेतली जाणारी भूमिका यामुळे प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर, तालुका सचिव संजय जड्यार, उपतालुकाध्यक्ष जयेंद्र कोटारकर, माडबन ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद गवाणकर, सागवे विभाग संघटक सादिक काझी, विभागाध्यक्ष सुरेंद्र मयेकर, उपविभागाध्यक्ष उमेश ढाले, सुनिल आये,शाळा अध्यक्ष शंकर लांबे, तसेच प्रसिद्धीप्रमुख (मीडिया) जयेश पडवळ यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याशिवाय राकेश कणेरी, नरेश आंबेकर, सुनिल नारेकर, मनोज वाडकर, सुज आडिवरेकर, हर्ष जड्यार, स्वानिक नध्यार, संकेत बाडेकर, योगेश सुर्वे, प्रमोद आंबेरकर, मच्छिंद्र बेश्कर, प्रभुनाथ नाटेकर, संदीप नाटेकर, मनोज आंबेरकर, रामबंद शिरगांवकर, मिलिंद देवक, मिलिंद आडिवरेकर, निनाद हरजकर, जितेंद्र आहिरकर, गोविंद ओवेरकर, सुनिल आंबेरकर, दिवाकर आंबेरकर, मुस्ताक हुने, जावेद मुजावर, संदेश बसनकर, सईम बोदवडेकर, आशिक मालीम** यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
आमदार किरण सामंत यांनी या वेळी बोलताना, शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष असून विकास, जनसेवा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान ही पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले. पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व न्याय दिला जाईल. राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर आपली ताकद वाढविल्याचे मानले जात आहे. प्रवेश सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध गावांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



