Uncategorizedकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

लोकमान्य टिळकांना बाळ माने यांचे अभिवादन

रत्नागिरी-  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी आमदार तथा दि यश फाउंडेशनचे विश्वस्त बाळ माने यांनी रत्नागिरीतील लोकमान्य टिळक जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” या ऐतिहासिक घोषणेद्वारे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवे चैतन्य देणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. अभिवादनानंतर बाळ माने यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन तसेच ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रसंगी दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button