आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी संकल्पनेवर आधारित महिला बचत गटांचे संमेलन उत्साहात पार

रत्नागिरी – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वदेशी’ या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चाच्या वतीने तालुका स्तरीय महिलांच्या बचत गटांचे संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या संमेलनात विविध बचत गटांच्या कार्यकर्त्या तसेच सीआरपी प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. महिलांच्या उद्योगांना चालना मिळावी, स्थानिक उत्पादन आणि विपणन वाढावे तसेच महिलांनी स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी मार्गदर्शन आणि माहिती देण्यात आली.
महिला जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या सूचनेचे महत्त्व अधोरेखित करताना स्थानिक उत्पादनांचा वापर करा, स्थानिक महिलांच्या हाताला काम द्या आणि घरगुती व्यवसायांना व्यासपीठ द्या, हेच समाजाच्या प्रगतीचे खरे माध्यम असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे नियोजन मध्यमंडळ तालुकाअध्यक्ष सुचिता नाचणकर आणि अनुष्का शेलार यांनी केले. या वेळी अनुश्री आपटे, नुपुरा मुळे, शिवानी रेमुलकर, शुभांगी घाणेकर, सायली केतकर, मंदा ठीक, मेधा देवस्थळी, केतकी केळुसकर, नम्रता इंगवले, वैभवी पालेकर, अश्विनी शेलार, मंजिरी चव्हाण आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
संमेलनाच्या शेवटी महिलांच्या प्रगतीसाठी स्वदेशी, उद्योजकता आणि बचत गटांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. महिलांनी उत्साहाने मार्गदर्शनाचा लाभ घेत पुढील कार्ययोजनांवर चर्चा केली.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



