कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक
३ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना — नागरिकांनी सहकार्य करावे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
रत्नागिरी- राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना २०२५ ही ३ नोव्हेंबरपासून देशभर सुरू होत आहे. ही पाचवी राष्ट्रीय सागरी मासेमारी जनगणना असून, मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही जनगणना राबवली जाणार आहे.

या जनगणनेत मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि मत्स्यव्यवसायात कार्यरत सर्वांनी जनगणनेत पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जीवन सावंत यांनी केले आहे.
कोकण ऑनलाईन



