कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीय
महाविकास आघाडी म्हणून लढलो तरच आपला विजय निश्चित- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने
देवरुख – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणनीती आखताना आता राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत..!राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी येणाऱ्या निवडणुकीत आघाडी केली तरच विजय शक्य आहे असा ठाम दावा केला आहे. मतदार जागेवर ठाम असून आघाडीची सत्ता येणार असल्याचे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही..! असा टोला त्यांनी कोकण ऑनलाईन शी बोलताना लगावला. यावेळी रत्नागिरी नगराध्यक्ष पदाची मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले..!
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



