ठाकरे यांचं वापरा आणि फेकून द्या पद्धतीचे राजकारण – मंत्री नितेश राणे यांचा खोचकटोला…

रत्नागिरी – वापरा आणि फेकून द्या पद्धतीचे राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बाजूला करून मनसेला जवळ केले असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. पण मग आता त्यांच्या महाविकास आघाडीला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची का असा खोचक टोला राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश आणि लगावला आहे.
जयगड बंदराच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रकट मते मांडली यावेळी त्यांनी उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर टीका करत महाविकास आघाडीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. राणी म्हणाले की उद्धव ठाकरे नेहमी सोयीचे राजकारण करतात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या मदतीने खासदार निवडून आणल्यानंतर आता त्यांना महाविकास आघाडी ऐवजी मनसे सोबत जायचे असल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही हीच त्यांची वापरा आणि फेकून द्या अशी पद्धत आहे अलीकडेच मातोश्री व त्यांना भेटायला गेलेले काँग्रेस नेता नाही त्यांनी भेट नाकारली काँग्रेस नेते बंटी पाटील यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते करायच्या प्रस्तावही उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावला असून त्यांना अनिल परब यांना हे पद द्यायचं आहे असे राणे म्हणाले.
कोकण ऑनलाईन



