रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे 13 व 14 सप्टेंबर रोजी निवड चाचणी
13 व 14 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत निवड चाचणी
रत्नागिरी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १४ वर्षांखालील गटाच्या सामन्यांकरिता रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे मुलांची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड चाचणी शनिवार, दिनांक १३ व रविवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे होणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेटचे सामने खेळविण्यात येणार आहेत. या सामन्यांसाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंनी शनिवारी सकाळी आधार कार्ड, 1 सप्टेंबर 2011 नंतरचा जन्म दाखला घेऊन उपस्थित राहावे असे आव्हान रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत, कार्यवाह दत्तात्रय साळवी, सचिव बिपीन बंदरकर यांनी केल आहे. अधिक माहितीकरता सहसचिव मनोहर गुरव, सहसचिव बालाराम कोतवडेकर यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
कोकण ऑनलाईन



