कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक
विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थिनीं बांधल्या जवानांना राख्या

रत्नागिरी – सर्वत्र रक्षाबंधन साजरे करण्यात आले. सामान्य नागरिकांपासून ते मोठमोठ्या उद्योजक, राजकीय नेत्यांनी रक्षाबंधन साजरे केले. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याची साक्ष देणारा दिवस. हा दिवस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थिनींनी रत्नागिरीतील भारतीय तटरक्षक दलाच्या हवाई स्थानक येथे जवानांना राख्या बांधत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी जवानांनी विद्यार्थिनींना तिरंगा भेट करत राष्ट्रभक्तीचे संस्कार दिले. यावेळी तटरक्षक दलाकडून अभाविपच्या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमावेळी मैत्रेयी सरदेसाई यांनी अभाविप परिचय करून दिला.



