कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ मतदान प्रक्रिया शांततेत सुरू

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे.

राजापूर–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी पत्नी वर्षा सामंत यांच्यासह पाली येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी त्यांनी सर्व नागरिकांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत जिल्ह्यात सरासरी ११ टक्के मतदान झाले असून, ग्रामीण भागातही मतदारांमध्ये चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक सुरक्षाव्यवस्था व प्रशासनाची दक्षता ठेवण्यात आली असून, कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.

दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.

कोकण ऑनलाईन ररत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button