Uncategorizedकोकणक्रीडामहत्वाची बातमीमहाराष्ट्र

मैदानातच थांबला जीवनाचा डाव… क्रिकेट खेळताना तरुणाचा अचानक मृत्यू

रत्नागिरी – शहरानजीकच्या चिंचखरी परिसरात सुरू असलेल्या क्रिकेट मॅचदरम्यान एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. क्रिकेट खेळत असतानाच प्रविण बबन पवार (वय अंदाजे 35 ) याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. खेळ सुरू असतानाच तो मैदानावर कोसळला. उपस्थित सहकाऱ्यांनी तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

रत्नागिरी शहराच्या क्रीडा क्षेत्रात प्रविण पवार हे नाव चांगलेच परिचित होते. उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्याची ओळख होतीच, त्याचबरोबर तो एक तरुण उद्योजक म्हणूनही समाजात सक्रिय होता. त्याच्या अचानक जाण्याने क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार, उद्योजक वर्ग आणि नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हसत-खेळत मैदानात उतरलेला तरुण क्षणार्धात काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मैदानातच जीवनाचा खेळ संपला, अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली आहे.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button