शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; अन्यथा काळी दिवाळी — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

रत्नागिरी – संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या वर्षी शेतकऱ्यांना “काळी दिवाळी” साजरी करावी लागत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने केली आहे.
शेतकऱ्यांना दिलेली तुटपुंजी मदत अपुरी असल्याने सरसकट कर्जमाफी किंवा हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी पक्षाने निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली.
हे निवेदन रत्नागिरी अतिरिक्त जिल्हाधिकारी गलांडे यांना जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी प्रदेश चिटणीस बशीर मुर्तुजा, रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले, युवक जिल्हाध्यक्ष नौशीन काझी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम, जिल्हा सरचिटणीस रणजीत शिर्के, माजी नगरसेवक बबन आंबेकर, शहर उपाध्यक्ष सनीफ गव्हाणकर, पंकज पुसाळकर, रवी घोसाळकर, देवरुख शहराध्यक्ष निलेश भुवड, मतीन मंगा, फर्जना मस्तान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



