Uncategorized

क्षितिज कांबळेचे रत्नागिरी टॅलेंट सर्च परीक्षेत सुयश

रत्नागिरी – जि.प.शाळा,साखरपा नं.१ ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी या शाळेचा विद्यार्थी कु. क्षितिज ऋतुजा महेश कांबळे याने रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी रत्नागिरी टॅलेंट सर्च या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

त्याच्या या यशात शाळेचे मुख्याध्यापक सुनील कांबळे सर,वर्गशिक्षक बाबासाहेब लाड सर सर्व सहकारी शिक्षक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशात शिक्षक संजय नटे, वर्षा बेबले, सुवर्णा वारके, ज्योती कांबळे, मुग्धा कुवळेकर यांचा फार मोलाचा वाटा आहे. त्याच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख दिव्या भाटकर, विस्तार अधिकारी तानाजी नाईक, गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
या स्पृहणीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक शिंदे, कोंडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका जोयशी मॅडम, ग्रामपंचायत सदस्य हर्षा आठल्ये यांनी अभिनंदन केले आहे.सर्वच स्तरातून क्षितिज व त्याचे आईवडील यांच्यावर अभिनंदनाचा होत आहे.

कोकण ऑनलाईन, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button