कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

येवल्यात ७६० कोटींची औद्योगिक गुंतवणूक; ३२०० रोजगारांच्या संधी – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत 

सुखजीत स्टार्च अँड केमिकल्ससोबत सामंजस्य करार; मका-आधारित मूल्यवर्धित उत्पादनांचा प्रकल्प उभारणार

येवला – येवल्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) आज करण्यात आला. सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स लिमिटेडकडून येवला एमआयडीसीमध्ये तब्बल ७६० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ३२०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात उद्योग आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून येवल्यात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पामध्ये मका-आधारित मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केली जाणार असून, त्याचा नाशिक जिल्ह्यातील कृषी-आधारित उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच शेतमालाला मूल्यवर्धनाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

“महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी मी कटिबद्ध आहे. येवल्यातील ७६० कोटींची गुंतवणूक हा स्थानिक औद्योगिक आणि रोजगार विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरेल,असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button