कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

अतिक्रमण हटवा, फुटपाथ मोकळे करा; मोकाट गुरे-भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करा

रमेश नगरवासीयांकडून रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाचे अभिनंदन; मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी

रत्नागिरी- रत्नागिरी शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली असून, या कारवाईचे वार्ड क्रमांक ५ मधील रमेश नगर परिसरातील रहिवाशांनी स्वागत केले आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत नगर परिषदेने घेतलेल्या भूमिकेबद्दल नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, बांधकाम सभापती राकेश नागवेकर, नगरसेवक संतोष कीर, वार्ड क्रमांक ५ च्या नगरसेविका पूजा पवार आणि सौरभ मलुष्टे यांची भेट घेत रहिवाशांनी त्यांचे अभिनंदन केले.

रत्नागिरी शहरातील अतिक्रमण हटविण्याची ही मोहीम केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील अनेक ठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे फुटपाथ पूर्णपणे मोकळे करून ते नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही रहिवाशांनी केली.

याशिवाय रत्नागिरी शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणीही नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली. मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी वार्ड क्रमांक ५ मधील राजन सावंत, समीर इंदुलकर, मोहन मालुसरे, मोहन देसाई, ज्येष्ठ क्रिकेटपटू दीपक देसाई, प्रमोद गानू आणि नंदू सावंत यांच्यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button