आरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड व मुकुल माधव फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीतून कर्तव्य प्रतिष्ठान, आडिवरे या संस्थेला वैद्यकीय उपकरणांचे वितरण

राजापूर- भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि गरजू रुग्णांना आरोग्यसेवेसाठी मदत मिळावी, या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (FIL) व तिचे CSR भागीदार मुकुल माधव फाउंडेशन (MMF) यांच्या वतीने राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील कर्तव्य प्रतिष्ठान या संस्थेला विविध वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत फोल्डिंग बेड, व्हीलचेअर, कमोड चेअर, शवपेटी, स्ट्रेचर तसेच इतर आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. या उपकरणांचा लाभ आडिवरे गावातील तसेच परिसरातील गरजू नागरिक व रुग्णांना होणार आहे.

ग्रामीण भागात अनेकदा वैद्यकीय उपकरणांच्या अभावामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत कर्तव्य प्रतिष्ठानला उपलब्ध करून दिलेल्या या उपकरणांमुळे रुग्णांना आवश्यक सुविधा गावातच मिळण्यास मदत होणार आहे. तसेच रुग्णांची ने-आण, रुग्णांची देखभाल आणि गरजू कुटुंबांना आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देणे अधिक सुलभ होणार आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (FIL) आणि मुकुल माधव फाउंडेशन (MMF) यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमामुळे आडिवरे व परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर मदतीचा हात मिळणार असून, गरजू रुग्णांसाठी ही उपकरणे निश्चितच उपयुक्त ठरतील. असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button