रत्नागिरी जिल्हा बँकेचे डिजिटल बँकिंग सेवेमध्ये उल्लेखनीय काम; ग्राहकांकडून १०१५ कोटी रूपयांचे डिजिटल व्यवहार

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात डिजिटल बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची नोंद करून ग्राहकांकडून एकूण १०१५ कोटी रूपयांचे डिजिटल व्यवहार नोंदविले आहेत. त्यापैकी UPI द्वारे ७९१ कोटी रूपयांचे व्यवहार झाले असून, ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहकांनीही डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घेतल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा बँकेने ग्राहकांना आधुनिक, सुरक्षित व सुलभ बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मागील काही वर्षांत डिजिटल सेवांचा सातत्याने प्रचार / प्रसार केला आहे. ATM, Mobile Banking, UPI, IMPS, QR Code, QR Sound Box यांसारख्या अत्याधुनिक सेवा सुविधा ग्राहकांकरिता उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहकांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणाहून सहज बँकिंग व्यवहार करता येत आहेत.
रत्नागिरी जिल्हा बँकेच्या बहुतांश शाखा ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत असून, या सर्व ग्राहकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बँकेने विशेष प्रयत्न केले आहेत. डिजिटल व्यवहारांचे प्रात्यक्षिक, ग्राहक मेळावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जनजागृती शिबीरे तसेच डिजिटल साक्षरता उपक्रम, फिरत्या ATM Van द्वारे प्रचार / प्रसार व सेवा यामुळे ग्राहकांचा डिजिटल व्यवहारांकडे विश्वास आणि प्रतिसाद यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निदर्शनास येते.
ग्राहकांच्या व्यवहारांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी बँकेने SMS Alert सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे खात्यातील प्रत्येक व्यवहाराची माहिती ग्राहकांना त्वरित त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होत असून, व्यवहारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. सायबर हल्ल्यापासून संरक्षण मिळणेकरीता २४ x ७ निरिक्षण केले जाते.
सातत्याने डिजिटल सुविधांचा प्रचार / प्रसार करत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनाही आधुनिक बँकिंग सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी बँक कटीबध्द आहे. डिजिटल व्यवहारांचा वापर वाढल्यामुळे ग्राहकांचा वेळ व खर्च वाचत असून व्यवहार अधिक सुरक्षित होत आहेत. भविष्यातही ग्राहकांच्या गरजांनुसार अधिकाधिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँक प्रयत्नशील राहील. ग्राहकांच्या सेवेकरिता १९ ATM केंद्र, ३ फिरती ATM व्हॅन याद्वारे बँक सेवा देत असून, लवकरच AEPS सेवेचा शुभारंभ करून डिजिटल सेवेमध्ये पुढचे पाऊल टाकत आहोत.”
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकाभिमुख सेवा, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सुरक्षित डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी भूमिका बजावत असून, भविष्यातही डिजिटल बँकिंगचा विस्तार अधिक वापर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे.
यावेळी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बँकेच्या विविध कर्ज योजना, ठेव योजना, सेवा-सुविधांचा लाभघेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
10/07/2026



