रत्नागिरी जिल्ह्यात ६८.१४ टक्के मतदान, गुहागर आघाडीवर; रत्नागिरीत सर्वात कमी प्रतिसाद

रत्नागिरी- जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ६८.१४ टक्के मतदान नोंदविण्यात आले. जिल्ह्यातील १,४२,४२६ मतदारांपैकी पुरुष ४९,१९८, महिला ५१,२२७ तर इतर १ मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील मतदानाचा आढावा घेतला असता गुहागर नगरपरिषदेने ७५.२६ टक्के मतदानासह सर्वाधिक प्रतिसाद नोंदवत आघाडी घेतली, तर रत्नागिरी नगरपरिषदेत केवळ ५५.०९ टक्के मतदान होऊन हा सर्वात कमी टक्का ठरला.

प्रमुख मतदान टक्केवारी
रत्नागिरी नगरपरिषद – ५५.०९%
एकूण मतदान : ३५,६६८
पुरुष : १७,२४५
महिला : १८,४२२
इतर : १
चिपळूण – ६४.१५%
खेड – ६२.५३%
राजापूर – ७४.५५%
लांजा नगरपंचायत – ७१.०६%
देवरुख – ७४.३३%
गुहागर – ७५.२६%
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली असून काही प्रभागांत मतदारांनी सकाळपासूनच उत्साहाने मतदानाला प्रतिसाद दिला. काही ठिकाणी मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. आता सर्वांचे लक्ष मतमोजणी दिवसावर केंद्रीत झाले आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



