कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

रत्नागिरीची शर्वरी पावसकरला ‘Innovative Architect of the Year 2025’ राष्ट्रीय गौरव

रत्नागिरी- रत्नागिरीची कन्या, आर्किटेक्ट शर्वरी रमेश पावसकर हिला देशपातळीवरील अत्यंत मानाचा असा Design & Vision D&V’25 Built Environment Leadership Awards मधील “Trusted & Innovative Architect & Designer of the Year 2025 – Maharashtra” हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गोवा येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात देशातील 28 राज्यांमधून निवड झालेल्या मान्यवरांमध्ये महाराष्ट्रातून शर्वरीची निवड होणे हा रत्नागिरीसाठी विशेष सन्मान मानला जात आहे.

वास्तुकलेच्या क्षेत्रातील तिची नवोन्मेषी दृष्टी, सर्जनशीलता व सातत्यपूर्ण कामगिरी याची दखल घेऊन हा बहुमान प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते, पद्मश्री आर्किटेक्ट जी. शंकर यांच्या हस्ते शर्वरीला मिळाला, ही तिच्यासाठी मोठी गौरवाची बाब ठरली.

शर्वरीच्या या यशाबद्दल रत्नागिरीकरांतून अभिमान व्यक्त केला जात असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

कोकण ऑनलाईन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button