रत्नागिरीत प्रभाग क्रमांक ४ मधून अजित पवार राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांचा जोरदार शक्तीप्रदर्शनात अर्ज दाखल
रत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे प्रभाग क्रमांक ४ मधून अधिकृत उमेदवार नौसीन काझी तसेच महिला सर्वसाधारण उमेदवार मुनव्वर-सुलताना फरान मुल्ला यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
राजकीय वर्तुळात अशी जोरदार चर्चा असून, शरद पवार गटातून अजित पवार गटात जाण्याच्या प्रक्रियेचे मास्टर माइंड म्हणून युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांचे नाव घेतले जात आहे. ते या निवडणुकीत कोकण नगर प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.अर्ज भरताना त्यांनी महिला उमेदवार सौ. मुनव्वर-सुलताना फरान मुल्ला यांच्यासह मोठ्या समर्थकांसोबत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीपीकडून रातोरात 15 उमेदवार उभे करण्यामध्ये काझी यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे.
निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचे दमदार प्रवेश पाहायला मिळाला असून आगामी राजकीय समीकरणात या शक्तीप्रदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



