रत्नागिरी नगरपालिका निवडणूक 2025 : शिवसेनेचे ९ उमेदवार जाहीर
महायुती उद्या करणार शक्तिप्रदर्शन

रत्नागिरी- रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) यांनी आपल्या नऊ उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी अंतिम करण्यात आली. रत्नागिरी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार किरण सामंत, यशवंत जाधव, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, विलास चाळके आणि बंड्या साळवी यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली.
शिवसेनेचे अधिकृत ९ उमेदवार (प्रभागानुसार):
प्रभाग २ — निमेश नायर
प्रभाग ३ — राजन शेट्ये
प्रभाग ५ — सौरभ मलुष्टे
प्रभाग ७ — गणेश भारती
प्रभाग ७ — श्रद्धा हळदणकर
प्रभाग ८ — बाळू साळवी
प्रभाग ९ — विजय खेडेकर
प्रभाग १३ — सुहेल साखरकर
प्रभाग १३ — आफरीन होडेकर
उद्या महायुतीचे शक्तिप्रदर्शन
शिवसेनेचे ९ आणि भाजपचे ६, असे एकूण १५ महायुतीचे उमेदवार उद्या, शनिवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज सादरीकरणापूर्वी महायुतीची दमदार शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात येणार असून पालकमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



