कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

श्री नवलाई पावनाई मंदिर,जाकीमिऱ्या येथे सालाबाद प्रमाणे अखंड नाम सप्ताहाला भक्तिभावाने सुरुवात…

कोकणातील निसर्गरम्य मिऱ्या गावात वसलेल्या श्री नवलाई पावनाई मंदिरात सालाबाद प्रमाणे यंदाही अखंड नाम सप्ताहाला भक्तिभावाने सुरुवात झाली आहे. गावातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या श्रद्धेने या सप्ताहात सहभागी होत असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय..

रत्नागिरी जिल्ह्यातील जाकी मिऱ्या हे निसर्गरम्य गाव – आणि याच गावात वसलेलं श्रद्धास्थान, श्री नवलाई पावनाईचं मंदिर. सालाबाद प्रमाणे यंदाही येथे अखंड नाम सप्ताह सुरू झालाय. मंदिर परिसरात सात दिवस नामस्मरण, भजन, कीर्तन आणि सत्संगाचं आयोजन करण्यात आलं असून, स्थानिक ग्रामस्थांपासून ते दूरवरून आलेले भाविकही मोठ्या श्रद्धेने सहभागी होतायत.भाविकांची गर्दी, परिसरातील आध्यात्मिक वातावरण आणि उत्साही गावकरी या सर्वांमुळे संपूर्ण मिऱ्या गाव भक्तिभावाने भरून गेलंय. ग्रामस्थांच्या सहकार्याने साजरा होणारा हा सप्ताह, केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, गावाच्या एकतेचं आणि श्रद्धेचं प्रतीक ठरतंय..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button