आरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर रत्नागिरीकरांचा विश्वास

रत्नागिरी – शहरातील मजगाव रोड नजीक साधना फाउंडेशनच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सेवांमुळे रत्नागिरी जिल्हावासियांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शासनाच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून साकारलेले हे हॉस्पिटल अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरवणारे महत्त्वाचे आरोग्य केंद्र म्हणून उदयास आले आहे.

या हॉस्पिटलचे लोकार्पण ६ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आले. सुसज्ज यंत्रसामग्री, स्वतंत्र आयसीयू व एसआयसीयू, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर यांसह हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी सज्ज आहे. रत्नागिरी शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉस्पिटलमुळे कोकणातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध होत आहे.

हॉस्पिटलमध्ये स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांचे नियमित मार्गदर्शन तसेच स्थानिक डॉक्टरांचे मोलाचे योगदान लाभत आहे. त्यामुळे रुग्णालयाची सेवा अधिक गुणवत्तापूर्ण होत आहे. आतापर्यंत सुमारे ५ हजारांहून अधिक रुग्णांना मोफत जनरल ओपीडी सेवा देण्यात आली असून सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ही सेवा मोफत उपलब्ध आहे. यासोबतच डायलिसिस व केमोथेरपीच्या सेवाही मोफत दिल्या जात आहेत.

या हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, युरो सर्जरी, नेत्रविकार तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच ब्लड व युरिन तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, २डी इको, ईसीजी, स्वतंत्र आयसीयू, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष अशा सुविधा उपलब्ध आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, वयोवंदना योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभही रुग्णालयामार्फत दिला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना आधुनिक, उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हाच या हॉस्पिटलचा मुख्य उद्देश असल्याची माहिती डॉ. समिधा गोरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. शेखर कोवळे, डॉ. रोहन आंबवकर, अभिजीत हेगशेट्ये उपस्थित होते.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button