कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्र
साईनगर ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत
रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हा इशारा

रत्नागिरी – तालुक्यातील काजरघाटी धार ते रत्नागिरी आरटीओ- कुवारबाव नाका दरम्यान रस्त्याची अक्षरशा खड्ड्याने चालन झाली आहे. ग्रामस्थांना या खड्ड्यांचा मोठा त्रास होत असून या ठिकाणी दोन-तीन अपघात झाली आहेत. तसेच या रस्त्यावरून गणपती घेऊन लोक जात असतात. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने गणपती सणाच्या अगोदर हे खड्डे भरले नाहीत तर साईनगर ग्रामस्थ 15 ऑगस्ट रोजी रस्त्यावर उपोषणाला बसणार आहेत असा इशारा साईनगरचे ग्रामस्थ महेश नागवेकर, समीर नाकाडे,आशिष शिवलकर, मनोज भाटकर, साई विलनकर आणि कुवारबाव चे माजी उप सरपंच नरेश विलनकर यांनी दिला आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



