कोकणक्रीडामहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

रत्नागिरी – आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त फैसल मुल्ला मित्र मंडळ, कोकण नगर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

चार दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची अंतिम लढत रत्नदीप पाटील वाडी संघ आणि आहिल वॉरियर्स, घुडे वठार संघ यांच्यात झाली. या चुरशीच्या सामन्यात रत्नदीप पाटील वाडी संघाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या अपूर्वा सामंत, रत्नागिरी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, के टीव्ही न्यूज चॅनलचे संचालक रज्जाक काझी, नगरसेविका आफ्रीन होडेकर, रुक्सार खान, फौजिया मुजावर यांच्यासह आयोजक फैसल मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर यांच्यासह उपविजेता आणि विजेत्या संघांना आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडाप्रेम आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्पर्धेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button