पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भाजपचा उपक्रम; अंगणवाडी सेविकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना केलं खाऊ वाटप…
रत्नागिरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भारतीय जनता पार्टीतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी मध्य मंडळातर्फे अंगणवाडी सेविकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

रत्नागिरीतील जांभूळ फाटा, हनुमान नगर, पाडावेवाडी, एमआयडीसी मिरजोळे, लक्ष्मीकांतवाडी, शीळ, नाखरेकरवाडी, पाटीलवाडी यासह सुमारे दहा अंगणवाडी केंद्रांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, रत्नागिरी मध्य मंडळ अध्यक्ष सुचिता नाचणकर, जिल्हा सचिव अनुश्री आपटे, मंडळ सचिव मेधा देवस्थळी, सदस्य गंधाली शेलार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाचनकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि बूथ सचिव प्रदीप नेवरेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाजातील विविध घटकांशी संवाद साधत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सुचिता संदीप नाचणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जिल्हा अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे सांगत या उपक्रमाची माहिती दिली. दरम्यान, भाजपकडून करण्यात आलेल्या सन्मानाबद्दल अंगणवाडी सेविकांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मान यासारखे उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



