कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कोल्हापुरात २३ ऑगस्टला तेली समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा

रत्नागिरी – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे राज्यातील सर्व तेली समाजाच्या पोटजातींचा भव्य राज्यस्तरीय महामेळावा २३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष संजय बापू विभुते रत्नागिरी दौऱ्यावर आले होते.

यावेळी श्रीसंताजी जगनाडे महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप उर्फ बावा नाचणकर, सचिव शरद कोतवडेकर, खजिनदार प्रभाकर खानविलकर, सल्लागार किशोर पावसकर, सदस्य बंड्या बसणकर, बाळा नाचणकर व अजित लांजेकर यांनी संजय विभुते यांचे स्वागत केले.

यावेळी संजय विभुते यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून महामेळाव्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली. समाजातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने कोल्हापूर येथील महामेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आज राज्यातील प्रत्येक समाजाचे संघटन मजबूत होत असून, प्रत्येक समाज आपल्या हक्कांसाठी लढत आहे. त्याचप्रमाणे तेली समाजही मागे राहता कामा नये. तेली समाजासाठी महामंडळ स्थापन झाले असले तरी त्याला स्वतंत्र दर्जा आणि आवश्यक निधी उपलब्ध झालेला नाही. या तसेच समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आल्याचे संजय विभुते यांनी के टीव्हीशी बोलताना सांगितले.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

17/08/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button