कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक
रत्नागिरीच्या सहाय्यक आयुक्त – मत्स्य व्यवसाय पदी जीवन सावंत यांची पदोन्नतीने नियुक्ती

रत्नागिरी- रत्नागिरी मत्स्य विभागाच्या सहाय्यक मत्स्य आयुक्त पदी जीवन सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जीवन सावंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना काही दिवसांसाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त म्हणून प्रभार देण्यात आला होता. रत्नागिरीच्या सहाय्यक मत्स्य आयुक्त पदी सागर कुवेसकर होते. त्यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभारच होता. आता पूर्ण वेळ सहाय्यक आयुक्त – मत्स्य व्यवसाय म्हणून जीवन सावंत यांना पूर्णवेळ पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली आहे. दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडून सदर आदेश काढण्यात आले आहेत. जीवन सावंत यांच्या या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
कोकण ऑनलाईन
13/08/2026



