कोकणपर्यटनमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराष्ट्रीय

कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचे प्रसाद आणि अभिजित धावणार

रत्नागिरी – दक्षिण आफ्रिकेत १४ जून रोजी होणाऱ्या जगप्रसिद्ध कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचे प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे ९९ वे वर्ष असून डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग दरम्यान ८५.७७ किलोमीटरची खडतर ‘अप रन’ होणार आहे. प्रसाद देवस्थळी यांनी गतवर्षी ही स्पर्धा पूर्ण केली होती, तर अभिजित पड्याळ यांचा हा पहिलाच सहभाग आहे. या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी दोघांनी ग्रामदैवत श्री देव भैरी यांचे दर्शन घेतले. यावेळी विविध संस्था आणि धावपटूंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सातत्यपूर्ण सराव आणि कोकणातील चढ-उतारांमुळे या स्पर्धेसाठी चांगली तयारी झाल्याचा विश्वास दोन्ही धावपटूंनी व्यक्त केला आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

09/06/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button