महत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीय
मंत्री आशिष शेलार यांच्या विभागाचा १०० दिवशीय कामाचा अहवाल प्रकाशन

मुबंई – माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या विभागाने पहिल्या १०० दिवसांत केलेल्या कामांचा अहवाल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत ह्यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला.
या अहवालात मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विभागाने केलेल्या पहिल्या 100 दिवसांतील कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन



