कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पानवल येथे युवा सेनेच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न

रत्नागिरी – ज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पानवलतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 35 जणांनी रक्तदान केले.

याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, पानवल उपसरपंच रवींद्र मांडवकर,युवासेना विभाग प्रमुख अमित तोडकर, उप-विभाग प्रमुख अभिजीत घोडके,शाखाप्रमुख निखिल तांबे, उप शाखाप्रमुख राकेश घवाळी,अजिंक्य घवाळी, आदित्य मांडवकर, विनायक घवाळी, आयुष मांडवकर, विघ्नेश मांडवकर, अभिषेक मांडवकर, प्रसाद घवाळी,यश घवाळी, सुशील घवाळी.तसेच सर्व युवासेना पदाधिकारी प्रशांत चाळके,औदुंबर कळंबटे,नीलेश अवेरे, सुमित नाईक, एकनाथ कळंबटे तसेच युवासैनिक शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

पानवल युवा सेनेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगळे उपक्रम राबविले जात असतात. यावर्षीही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पानवल मधील ग्रामस्थांनी या शरीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवा वर्गाबरोबरच महिलाही उत्स्फूर्तपणे या सहभागी झाल्या होत्या. 35 ग्रामस्थांनी रक्तदान करीत, या उपक्रमात सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्या ग्रामस्थान चे विशेष कौतुकही युवा सेनेच्या वतीने करण्यात आले.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button