महाराष्ट्रातील सर्वोत्तम मंत्री कोण? ना. उदय सामंत टॉप ३ मध्ये
पत्रकारांच्या सर्व्हेमधून मंत्र्यांचे मूल्यमापन

मुबंई – महाराष्ट्र दिनमान वेब पोर्टल व युट्यूब चॅनलच्या वतीने राज्यभरातील पत्रकारांचा सर्व्हे करण्यात आला. मंत्रिमंडळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले.
🔷 पत्रकारांचा तटस्थ सर्व्हे
राज्यभरातील ५० ज्येष्ठ व कार्यरत पत्रकारांकडून सहा महत्त्वाच्या मुद्द्यांवर मंत्र्यांचे मूल्यमापन झाले.
🔷 सर्व्हेचे सहा निकष
शंभर दिवसांचा कार्यक्रम, राज्यपातळीवरील कामकाज, आरोप व प्रतिमा, खात्याचा कारभार, नागरिकांसाठी उपलब्धता आणि जबाबदार नेतृत्व या मुद्द्यांचा समावेश होता.
🔷 टॉप ५ मंत्री
१) चंद्रशेखर बावनकुळे – ४७%
२) आशिष शेलार – ४५%
३) उदय सामंत – ४२.८%
४) आदिती तटकरे – ४१.१%
५) प्रकाश आबिटकर – ३७.५%
उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कामकाज राज्यातील पत्रकारांनी विशेष उल्लेखनीय ठरवले आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



