आरोग्यकोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

एनएचएम कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के मानधन वाढ…आरोग्यमंत्र्यांची मानधन वाढीस मान्यता.   

मुंबई -10 राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 15 टक्के मानधन वाढ देण्यात येणार आहे. त्याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुन, राज्यभरातील पन्नास हजारावर (50000) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांचा आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दहा वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना ESIS अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे. कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार,अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात mकार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील mतफावत दूर करणे, यासह इतर मागण्याच्या बाबत शासन सकारात्मक असुन, पुढील mकार्यवाहीसाठी सादर केला आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button