कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांच्या नावाची जोरदार चर्चा

रत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांच्या नावाची चर्चा सध्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये जोरात सुरू आहे. या प्रभागात कोकण नगर, कीर्ती नगर, क्रांतीनगर, स्टेट बँक कॉलनी, नगरपरिषद कर्मचारी वसाहत तसेच चरमले या भागांचा समावेश आहे.

या प्रभागात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मुसा काजी सक्रिय होते. परंतु त्यांनी पक्षाशी गद्दारी करून शिवसेना मध्ये प्रवेश केला आणि सध्या भाजपसोबत युती असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेत कार्यरत आहेत.

दरम्यान, मागील पाच वर्षांपासून नौसीन काझी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा प्रभागात सांभाळत सातत्याने जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या कोकण नगर येथील जनसंपर्क कार्यालयामार्फत नागरिकांच्या विविध जनहिताच्या कामांवर ते काम करीत आहेत. लाईट, पाणी, गटार, रस्ते अशा स्थानिक समस्यांबाबत ते सातत्याने नगरपालिकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत असतात.

तसेच सेतू केंद्रामार्फत नागरिकांची रेशन कार्ड, आधार कार्ड, वैद्यकीय मदत, तसेच शासकीय योजनांशी संबंधित कामे ते प्रामाणिकपणे करतात. इलेक्शन कार्ड नवीन बनवणे, नाव दुरुस्ती, पत्ता बदल आदी सेवा ते निशुल्कपणे नागरिकांना उपलब्ध करून देतात.

याच कामांमुळे नौसीन काझी यांनी नागरिकांमध्ये भक्कम जनाधार निर्माण केला असून, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारासाठी प्रभाग क्रमांक ४ मधून मोठ्या प्रमाणावर लीड मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

स्थानिक जनतेत त्यांचा दांडगा संपर्क आणि कार्यशैलीमुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या विरोधकांना या प्रभागात कठीण लढत द्यावी लागणार, असे चित्र दिसून येत आहे.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button