प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी शहरातर्फे गणेशोत्सव ऑनलाइन स्पर्धेचे बक्षीस वितरण

भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरिक व युवक-युवतींनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज या स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, युवा जिल्हाध्यक्ष मंदार खांडकर, शहराध्यक्ष दादा ढेकणे, तसेच मनोज पाटणकर, निलेश आखाडे, संदीप सुर्वे, शैलू बेर्डे, नितीन जाधव, समीर वस्ता यांसारखे मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
विजेत्यांचा गौरव:
प्रथम पारितोषिक – साईराज प्रकाश नाचणकर, तेली आळी – शिल्ड व रोख रक्कम
द्वितीय पारितोषिक – अर्जुन गोलतकर, नाकोडा पार्क – शिल्ड व रोख रक्कम
तृतीय पारितोषिक – शुभम सचिन आडमकर, मच्छी मार्केट – शिल्ड व रोख रक्कम
उत्तेजनार्थ – दीपिका दिनेश कुबल, भगवती बंदर – शिल्ड व रोख रक्कम
उत्तेजनार्थ – मयूर राजेंद्र आग्रे, सुवरेवाडी – शिल्ड व रोख रक्कम
याशिवाय सर्व स्पर्धकांना सहभाग ट्रॉफी देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना शिल्ड व रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक परंपरांचा सन्मान राखत नवनवीन माध्यमांतून सहभागी होण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
विशेष म्हणजे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, सरचिटणीस निलेश आखाडे व संदीप सुर्वे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी करून संपूर्ण सोहळा संस्मरणीय केला.
कार्यक्रमाच्या व्यवस्थापनामुळे संपूर्ण सोहळ्यात आनंदाचे व सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कोकण ऑनलाईन



