कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

जि.प.शाळा पूर्णगड नं.१ शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन उपक्रम उत्साहात संपन्न. 

रत्नागिरी – जि.प.शाळा पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी या शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्र पावस अंतर्गत पूर्णगड उपकेंद्र यांच्यामार्फत साथीचे रोग यावेळी कोणती काळजी घ्यावी तसेच आरोग्य विषयक माहीती, एच.पी.व्ही. लसीकरण यांचे पालक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन आरोग्य सेवक श्री अनिल धोपटे, पावसकर मॅडम यांनी केले. या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, पालक उपस्थित होते. आरोग्य विषयक चांगली माहिती दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे यांनी सर्वांचे आभार मानले. उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक-पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी परिश्रम घेतले. शाळेच्या या उपक्रमाविषयी केंद्रप्रमुख श्री संजय राणे सर यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button