व्यक्तिमत्व विकासामध्ये सॉफ्ट स्किल्स ची भूमिका महत्त्वाची- डॉ. संदिप करे.

रत्नागिरी – शिक्षणाच्या विविध टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्ट स्किल्स आत्मसात करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये सॉफ्ट स्किल्स महत्त्वाची भूमिका बजावतात असे मत रत्नागिरीतील प्रतीत यश डॉक्टर संदीप करे यांनी व्यक्त केले
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय आणि रोटरी क्लब रत्नागिरी मीडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यांनी सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट यशाचा मंत्र या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय गवाळे, रोटरी क्लब रत्नागिरी मीडटाउन चे अध्यक्ष सौ. स्वप्ना करे , श्री. कदम उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुकुमार शिंदे यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी अध्यक्षीय
मनोगतात विद्यार्थी करियर निवडताना विद्यार्थ्यांना हार्ड स्किल्स मुलाखती पर्यंत घेऊन जाऊ शकतात परंतू नोकरी मिळविण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी सॉफ्ट स्किल्स महत्त्वाचे असतात. असे मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निकिता नलावडे यांनी केले. तर आभार प्रा. श्रेया राऊत यांनी मानले.



