कोकणपर्यटनमहाराष्ट्रसामाजिक

मराठा मंडळ रत्नागिरीच्या सुवर्णमहोत्सवानिमि त्त आजपासून रत्नागिरीत शॉपिंग अँड फूड फेस्टिवल सुरु…

रत्नागिरी – मराठा मंडळ, रत्नागिरीच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने रत्नागिरीमध्ये भव्यदिव्य अशा शॉपिंग अँड फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार दि. २५ एप्रिलपासून रविवार दि. २७ एप्रिल असा सलग ३ दिवस हा शॉपिंग अँड फूड फेस्टिवल संपन्न होत आहे.

या फेस्टिवलचे उद्घाटन श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसेच श्रीराम मंदिर संस्थेच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांच्याहस्ते करण्यात आले आहे. यावेळी मराठा मंडळ अध्यक्ष डॉक्टर रमेश चव्हाण, कार्याध्यक्ष सुनील दत्त देसाई, उपाध्यक्ष केशवराव इंदुलकर, खजिनदार भाऊ देसाई, संचालक एडवोकेट अजय भोसले, सौ गीता सावंत, सौ वंदनाताई देसाई,श्री अविनाश सावंत, श्री सुधाकरराव सावंत,महिला अध्यक्ष सौ अंजनी इंदुलकर, श्री उपेंद्र सुर्वे,श्रीमती काकी नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरीतील मराठा भवन, माळनाका येथे सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा फेस्टिवल सुरू असेल. फूड अँड शॉपिंग फेस्टिवलमध्ये फनी गेम्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ८ या वेळात सांस्कृतिक कार्यक्रम आणि फनी गेम्स होतील.

शॉपिंग अँड फूड फेस्टिवलसह महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शनदेखील असणार आहे. इमिटेशन ज्वेलरी, कपडे, कोकणातील प्रसिध्द उत्पादने, सजावटीचे साहित्य, हँडमेड साबणासह खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये असणार आहेत. एकंदरीत २५, २६ आणि २७ एप्रिल असे ३ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलमध्ये प्रवेश विनामूल्य आहे.

कोकण ऑनलाईन, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button