कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक
पतीतपावन मंदिरात दुमदूमणार हरी नामाचा गजर

रत्नागिरी – रत्नागिरीतील दानशूर भक्तीभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक पतितपावन मंदिरात दर महिन्याच्या शिवरात्रीला वेगवेगळ्या भजनी बुवांच्या माध्यमातून संध्याकाळी भजनाचा गजर होत आहे. शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरीतील सुप्रसिद्ध भजनी श्री.संजयबुवा (बाबू) मेस्त्री व रत्नागिरी मधील इतर भजनमंडळांचे बुवा हे संध्याकाळी ७:०० वाजता पतितपावन मंदिरात भजन करणार आहेत.
भजनासाठी विशेष सहकार्य एकमुखी दत्तमंदिर घुडेवठार मठ भजन मंडळाचे श्री.साईनाथ शेठ नागवेकर व सुप्रसिद्ध भजनी भरतसूत श्री.सुदेश बुवा नागवेकर यांच्या माध्यमातून लाभत आहे. या भजन कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहून सुश्राव्य भजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण ऑनलाईन, रत्नागिरी



