कोकणमहत्वाची बातमीसामाजिक
प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद माझ्यावर कायम असल्याचे मला समाधान- मंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी – श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी रत्नागिरीमधील रामआळी येथील पुरातन अशा श्रीराम मंदिरात जाऊन मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
दरवर्षी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर मी येथे येऊन दर्शन घेत असतो. प्रभू रामाचा आशीर्वाद माझ्यावर कायम असल्याचे समाधान मला यनिमित्ताने मिळत आहे, असे यावेळी ना. उदय सामंत म्हणाले.
श्रीराम मंदिर समितीच्यावतीने ना. उदय सामंत यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या पवित्र प्रसंगी अनेक पदाधिकारी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन, रत्नागिरी



